जयंतीच्या निर्मात्यांकडून · मिलिओरिस्ट फिल्म स्टुडिओ प्रस्तुत From the makers of Jayanti · A Meliorist Film Studio presentation
चर्चा तर होणारच! Charcha Tar Honarach — the discussion is inevitable!
व्हॉट्सॲपवर 9076007722 या क्रमांकावर “Hi” पाठवा आणि चळवळीचा भाग बना.Send “Hi” to 9076007722 on WhatsApp and become part of the movement.
क्लिक कराClick Hereतुमच्या शहरातील शो आणि बुकिंगची माहिती लवकरच येथे उपलब्ध होईल.Show timings and booking details for your city will be available here soon.
क्लिक कराClick Hereरील बनवा, चित्रपटाचा आवाज बना आणि ‘जयंती रील-स्टार’ होण्याची संधी मिळवा.Make a reel, become the film's voice and get a chance to be the Jayanti Reel-Star.
क्लिक कराClick Here११ सप्टेंबर २०२६ पासून जयंती-२ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. अनेक संघर्षांतून गेलेला हा चित्रपट अखेर राज्यभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुमारे सहा महिने सेन्सॉर बोर्डाकडे प्रलंबित राहिल्यानंतर, प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर हा चित्रपट प्रेक्षकांसमोर येत आहे.
जयंती-२ प्रथमच अत्यंत कठीण आणि विचार करायला लावणारे विषय हाताळतो आणि ते सशक्त कथाकथन व दमदार अभिनयातून मांडतो. हा केवळ चित्रपट नाही; ही एका वैचारिक क्रांतीची सुरुवात आहे. चित्रपटात मांडलेले वास्तव आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांशी आश्चर्यकारकपणे मिळतेजुळते आहे.
चित्रपट एक थेट आणि धाडसी प्रश्न विचारतो: संविधानाने आपल्याला दिलेले हक्क आणि स्वातंत्र्य आजच्या व्यवस्थेत खरोखर अस्तित्वात आहेत का? तसेच शिक्षण व्यवस्थेत वाटचाल करताना आपल्या तरुण पिढीला आणि विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी व संघर्षही तो समोर आणतो.
दर काही दशकांत असा एखादा चित्रपट येतो, ज्यात सामाजिक समीकरणे बदलण्याची आणि समाजाच्या विचारपद्धतीत परिवर्तन घडवण्याची ताकद असते. असा चित्रपट बनवण्यासाठी प्रचंड धाडस लागते — आणि ते धाडस लेखक-दिग्दर्शक शैलेश बळीराम नरवाडे यांनी दाखवले आहे.
हा चित्रपट किमान तीन आठवडे चित्रपटगृहांत टिकून राहावा, यासाठी आपण सर्वांनी या चित्रपटाचे राजदूत बनूया. मित्र, कुटुंब आणि समाजाला सोबत घेऊन मोठ्या संख्येने चित्रपटगृहात जाऊन जयंती-२ पाहूया — आणि एकत्र येऊन एक विक्रम घडवूया!
Jayanti 2 releases across Maharashtra on 11 September 2026. A film that has gone through numerous struggles is finally reaching audiences in theatres across the state — after being kept pending with the Censor Board for nearly six months.
For the first time, Jayanti 2 takes on extremely difficult, thought-provoking subjects and presents them through powerful storytelling and outstanding performances. This is not merely a film; it marks the beginning of a revolution in thought. The reality portrayed in the film bears striking similarities to events unfolding around us.
The film raises a bold, direct question: do the rights and freedoms guaranteed by the Constitution truly exist within the system we live in today? It also brings forward the struggles faced by our younger generation and students as they navigate the education system.
Every few decades a film comes along with the power to challenge social equations and change the way society thinks. Creating such a film requires immense courage — and that courage has been demonstrated by writer-director Shailesh Baliram Narwade.
We appeal to everyone: become the voice and ambassadors of this film. Gather your friends, families and communities, watch Jayanti 2 in theatres with enthusiasm and pride, and help it stay in cinemas for at least three weeks. Let us create a record together!
युवा क्रांती, विद्यार्थ्यांची ताकद आणि नव्या पिढीचा आवाज — जयंती-२ ही आजच्या तरुणाईची कथा आहे.
Youth revolution, the power of students and the voice of a new generation — Jayanti 2 is the story of today's youth.
चळवळीत सामील व्हाJoin the Movementट्रेलर पाहा — आणि शेअर करायला विसरू नका!Watch the trailer — and don't forget to share it!
ऋतुराज वानखेडेRuturaj Wankhede
@ruturaj_wankhede
प्रियदर्शिनी इंदलकरPriyadarshini Indalkar
@shini_da_priya
पायल जाधवPayal Jadhav
@i_mpayal
रोहिणी हट्टंगडीRohini Hattangadi
@rohinihattangady
देविका दफ्तरदारDevika Daftardar
@devikadaftardar
विजय निकमVijay Nikam
@vijaynikam4761
राजकुमार जरांगेRajkumar Jarange
@rajkumar_jarange
मानसी सुभाषManasi Subhash
@manasisubhash_
“जयंती मिशन” म्हणजे केवळ एक अभियान नाही, तर समाजातील ज्यांना स्वतःचा आवाज मांडण्याची संधी मिळत नाही, अशा विषयांना, प्रश्नांना आणि घटकांना वाचा फोडण्याचा एक प्रखर प्रयत्न आहे.
आपल्या समाजात अनेक महत्त्वाचे प्रश्न असे आहेत, जे रोजच्या धावपळीत दुर्लक्षित राहतात. काही समस्या सर्वांसमोर असूनही त्यावर पुरेशी चर्चा होत नाही, तर काही घटकांचे प्रश्न त्यांच्या सामाजिक, आर्थिक किंवा इतर मर्यादांमुळे समाजाच्या मुख्य प्रवाहापर्यंत पोहोचतच नाहीत. अशा वंचित, दुर्लक्षित आणि उपेक्षित घटकांच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देणे, ही जयंती मिशनची प्रमुख भूमिका आहे.
जयंती मिशनच्या माध्यमातून समाजातील विविध स्तरांतील लोकांच्या समस्या, संघर्ष, अनुभव आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो. केवळ समस्या मांडणे एवढ्यावर हे अभियान थांबत नाही, तर त्या समस्यांवर संवाद, जनजागृती आणि सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याच्या दिशेनेही प्रयत्न केले जातात.
“ज्यांना वाचा नाही, अशांना वाचा देणे; ज्यांचे प्रश्न दुर्लक्षित आहेत, त्यांना समाजाच्या केंद्रस्थानी आणणे; आणि परिवर्तनासाठी लोकांना एकत्र आणणे” — हीच या अभियानाची प्रेरणा आहे.
कारण परिवर्तनाची सुरुवात तेव्हाच होते, जेव्हा एखाद्या न ऐकल्या गेलेल्या आवाजाला ऐकून घेतले जाते. आणि म्हणूनच —
जयंती मिशन म्हणजे आवाज नसलेल्यांचा आवाज, दुर्लक्षित प्रश्नांचे व्यासपीठ आणि सकारात्मक परिवर्तनासाठी पेटलेली एक प्रखर ज्योत.
“Jayanti Mission” is not merely a campaign; it is a powerful initiative to give a voice to the subjects, issues and sections of society that rarely get the opportunity to express themselves.
Our society faces many important issues that remain overlooked in the rush of everyday life. Some problems are visible to everyone yet receive little discussion, while the concerns of certain sections never reach the mainstream because of social, economic or other limitations. Providing a platform to the concerns of the marginalized, neglected and underrepresented is the primary objective of Jayanti Mission.
Through Jayanti Mission, efforts are made to understand the problems, struggles, experiences and aspirations of people from different sections of society. The campaign does not stop at highlighting these issues — it seeks to create dialogue, awareness and positive social transformation around them.
“To give a voice to those who have no voice; to bring neglected issues to the centre of public attention; and to unite people for positive change” — this is the inspiration behind the Jayanti Mission.
Because real change begins when an unheard voice is finally listened to. And that is why —
Jayanti Mission is the voice of the voiceless, a platform for neglected issues, and a powerful flame burning for positive social transformation.
मिशनची पुढील माहिती याच क्रमांकावरून व्हॉट्सॲप संदेशाद्वारे दिली जाईल. Further information about the mission will be shared with you via WhatsApp from this number.
११ सप्टेंबर २०२६ पासून महाराष्ट्रभर प्रदर्शित. चित्रपटगृहांची यादी आणि बुकिंग लिंक लवकरच येथे उपलब्ध होतील. अपडेट्ससाठी जयंती मिशनमध्ये सामील व्हा. Releasing across Maharashtra from 11 September 2026. The theatre list and booking links will be available here soon. Join the Jayanti Mission on WhatsApp for updates.
अपडेट्स मिळवाGet Updatesजयंती-२ चा आवाज बना! चित्रपटाविषयी रील बनवा, शेअर करा आणि ‘जयंती रील-स्टार’ होण्याची संधी मिळवा. स्पर्धेचे संपूर्ण नियम आणि बक्षिसांची घोषणा लवकरच व्हॉट्सॲपद्वारे केली जाईल. Become the voice of Jayanti 2! Create reels about the film, share them, and get a chance to become the Jayanti Reel-Star. Full contest rules and prizes will be announced soon via WhatsApp.
स्पर्धेत सहभागी व्हाParticipate Now